Author: Hindavinewsnetwork@gmail.com
हिंदवी न्यूज | पिंपरी आपली भाषा आपल्या संस्कृतीची निदर्शक असते. मराठी संस्कृती टिकायची असेल तर मराठी भाषा टिकली पाहिजे. मराठी भाषा टिकावी,असे वाटत असेल तर मराठी शाळा उत्तम चालल्या पाहिजेत. सरकारी अनास्थेमुळे मराठी शाळा बंद पडताहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे”, असे मत प्रसिद्ध लेखक व वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. पुणे माध्यमिक शाळा शिक्षकेतर सहकारी पतपेढीतर्फे आयोजित पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात मिलिंद जोशी बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण महामंडळाचे सचिव ॲड. संग्राम कोंडे देशमुख, शिक्षकेतर सहकारी पतपेढीचे अध्यक्ष शिवाजी खांडेकर, सचिव देवेंद्र पारखे, उपाध्यक्ष प्रसन्न कोतुळकर, खजिनदार सुनील पदम, पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष…
हिंदवी न्यूज | पुणे मुलीचा कायमस्वरूपी ताबा वडिलांकडे राहील, मात्र तिचा योग्य सांभाळ झाला नाही तर आईला न्यायालयात कस्टडी मागण्याचा अधिकार असेल. आईल महिन्यातून दोन दिवस मुलीला भेटण्याचा तसेच दिवाळी किंवा उन्हाळी सुट्टीत तिच्यासोबत वेळ घालविण्याचा अधिकार राहील. मुलीसाठी ठेवलेले दागिने ती सज्ञान होईपर्यंत विकता येणार नाहीत, या अटी-शर्ती ठरल्या अन् दिवाणी न्यायाधीश एस. एन. रतकंठवार-जावादार यांच्या न्यायालयानेही परस्पर संमतीने घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. सात जन्मांच्या आणाभाका घेत सुरू झालेला संसार अखेर चिमुकलीच्या भवितव्याला प्राधान्य देत न्यायालयात संपला. हरीश आणि रुपाली (दोघांचीही नावे बदललेली आहेत) यांचा १८ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. मात्र, वैचारिक…
सात वर्षाहून अधिक अनुभवी सरकारी वकिलांना आता विशेष दर्जा पुरावे सादर करण्यापासून अंतिम युक्तिवादापर्यंतची प्रक्रिया होणार सक्षम हिंदवी न्यूज | पुणे चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये न्यायासाठीची प्रतीक्षा कमी करून पीडित बालकांना जलद न्याय मिळावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यभरातील किमान सात वर्षांचा अनुभव असलेल्या सरकारी वकिलांना विशेष पॉक्सो सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आले असून, त्यामुळे विशेष न्यायालयांमधील खटल्यांचा अधिक प्रभावी पाठपुरावा होणार आहे. पुरावे सादर करण्यापासून अंतिम युक्तिवादापर्यंतची न्यायप्रक्रिया अधिक सक्षम होऊन दोषींना शिक्षा होण्याचा वेग वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विधी व न्याय अंतर्गत नेमणूक झालेल्या सरकारी वकीलांनाही विशेष अधिकार मिळावेत याबाबत…
नगरसेवक प्रा उत्तम केंदळे व नगरसेवक बापू घोलप यांच्या उपसूचनेद्वारे सर्वसाधारण सभेत ठराव. हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी-चिंचवड शहरातील सेक्टर क्र. २२, निगडी येथील जेएनएन युआरएम (JNNURM) अंतर्गत पुनर्वसित झोपडपट्टीधारकांना मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर मालमत्ता करामध्ये सवलत मिळणार आहे. आमदार महेशदादा लांडगे यांनी विधानसभेत केलेल्या मागणीला आता स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक प्रा उत्तम केंदळे व नगरसेवक बापू घोलप यांचा पाठिंबा मिळाला असून त्यांनी महापालिकेतील आज (दि.२७) रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे सर्वसाधारण सभेत ठराव करण्यात आला आहे.राज्य शासनाकडे यासंदर्भातील प्रस्ताव विचाराधीन आहे.आमदार महेशदादा लांडगे यांनी यापूर्वी विधानसभेत चिखली घरकुल तसेच ईडब्ल्यूएस (EWS) आणि पुनर्वसन योजनांतील रहिवाशांना करामध्ये सवलत देण्याची मागणी केली होती.…
हिंदवी न्यूज | आळंदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकीतून आळंदी ग्रामीण व आळंदी शहर भारतीय जनता पक्षाचे वतीने उत्साहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आळंदी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजन करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंगशेठ ठाकूर, सरचिटणीस राहुल घोलप, युवा मोर्चा अध्यक्ष उमेश थोरवे, उपाध्यक्ष प्रथमेश लेखंडे, सरचिटणीस प्रथमेश होले, माजी जिल्हा सरचिटणीस गहिनीनाथ लेखंडे, किसान मोर्चा अध्यक्ष सुरेश लेखंडे, ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष देवानंद बवले, माजी सभापती कल्पना पाटीलबुवा गवारी, सोशल मीडिया अध्यक्ष कार्तिक पिंगळे, सचिव गुरुदास गवारी, कामगार आघाडी अध्यक्ष सोमनाथ…
हिंदवी न्यूज | पिंपरी आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगरनेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दिंडी सांगता समारंभ आणि वारकरी श्रमिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत तुकाराम नगर येथे सलग दुसऱ्या वर्षी दिंडी काढण्यात आली. दिंडीत हजारो वारकरी, श्रमिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या सोहळ्यास चिंचवडचे आमदार शंकरराव जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, भाजपचे शहर प्रभारी भरत नाना पाटील, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, ॲड मोरेश्वर शेडगे, अबोलीताई पिसाळ यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ…
श्रींचे समाधीवर तुळशीपत्र अर्पण करीत पुष्पवृष्टी दिगंबर महाराज नरवडे यांची सुश्राव्य कीर्तन सेवा विश्व प्रार्थना पसायदान संसदेत लावण्याची मागणी :- डॉ. नंदकिशोर एकबोटे हिंदवी न्यूज | आळंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात कारगिल युद्धात ज्यांनी आपले दोन्ही पाय गमावले, असे माजी सैनिक (नायक) संदीप इंदलकर, पुरातत्वाचे अभ्यासक, भारतीय संस्कृती संरक्षण संस्थान, पुणे कार्यवाह डॉ. नंदकिशोर शशिकला रमाकांत एकबोटे यांच्या विशेष उपस्थितीत ‘भारतीय सैन्य कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती संरक्षण संस्थान द्वारा कारगिल विजय दिवस भारतीय सैनिकांना मानवंदना देत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर तुळशीहार व पुष्पवृष्टी करत साजरा करण्यात आला. या निमित्त विविध कार्यक्रम…
सार्वजनिक स्वच्छतागृह धोरणाच्या दिशेने महापालिकेची पावले हिंदवी न्यूज | पिंपरी हरातील सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृह अधिक स्वच्छ, सुरक्षित, सुलभ आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सार्वजनिक स्वच्छतागृह धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या धोरणात नागरिकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष अनुभवांचा समावेश करण्यासाठी निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींसोबत केंद्रित गटचर्चा आयोजित करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छता गृहांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत धोरणाचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यामध्ये नागरिकांच्या सूचना आणि अपेक्षांचा समावेश…
हिंदवी न्यूज | पिंपरी आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी येथे ( दि.२५) आयोजित दिंडी व कामगार वारकरी मेळाव्यात डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख कुलपती डॉ पी. डी. पाटील यांचा “शिक्षणमहर्षी” पुरस्काराने गौरव करण्यात आला. या सोहळ्यास आमदार शंकरराव जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, भाजपचे शहर प्रभारी भरत नाना पाटील, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह अनेक मान्यवर, वारकरी व श्रमिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशवंत भोसले यांनी डॉ. पी. डी. पाटील यांच्या चार दशकांहून अधिक काळातील शैक्षणिक योगदानाचा गौरव करत, “हा पुरस्कार कोणत्याही शासनाचा नाही, तर समाजाचा…
चिखली घरकुल परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडग्यासाठी महापौरांची पाहणी; संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश हिंदवी न्यूज | पिंपरी मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे चिखली येथील घरकुल परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून नागरिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी पालिकेच्या सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां समवेत परिसराची सविस्तर पाहणी करून समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या. यापूर्वी झालेल्या स्थळ पाहणीदरम्यान नागरिकांना लवकरच सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह पुन्हा भेट देऊन समस्येचे मूळ कारण शोधून त्यावर शाश्वत उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन महापौरांनी दिले होते. त्या अनुषंगाने जलनिस्सारण, स्थापत्य, पाणीपुरवठा तसेच इतर संबंधित विभागांच्या…