Author: Hindavinewsnetwork@gmail.com

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी घेतली संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक हिंदवी न्यूज | पिंपरी शहरातील घनकचरा व्यवस्थापन विकेंद्रित करण्याच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला महापालिकेने गती दिली आहे. या केंद्रांसाठी योग्य जागांची तातडीने निश्चिती करून अत्याधुनिक कचरा प्रक्रिया केंद्र उभारणीचे नियोजन करण्याचे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना दिले आहेत. महापालिका सभेत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांची प्राथमिक बैठक घेतली. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील उपलब्ध जागांचा…

Read More

हिंदवी न्यूज  | पिंपरी  मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सभेत दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक व सामाजिक आधार देण्यासह दुर्घटनेची सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना महापालिके मार्फत रुपये १० लाखांची आर्थिक मदत, तर जखमींना प्रत्येकी रुपये १ लाखांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. ठेकेदार मे. अँटोनी लारा यांच्यामार्फत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसाना ५० लाख मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार. तसेच मृतांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च करण्यात येणार असून, मृत व्यक्तींच्या कुटुंबातील पात्र वारसांना महानगरपालिका सेवेत नोकरी मिळण्याच्या दृष्टीने शासनाकडे आवश्यक…

Read More

हिंदवी न्यूज  | पिंपरी पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कचरा संकलन (डेपो) नाही तर अत्याधुनिक पद्धतीचे व दुर्गंधीमुक्त कचरा प्रक्रियाकेंद्र उभारण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. महापालिका सभेत मोशी येथील एकाच ठिकाणी संकलन (डेपो) व प्रक्रिया केंद्र असल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे, त्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी बोलताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरात कचरा डेपो नाही तर आधुनिक स्वरूपातील प्रक्रिया केंद्रे उभारण्याचे ठरवले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read More

इंद्रायणी नदी घाट भाविकांविना पोरका. घाटावर जाण्यास पोलीस प्रशासनाची बंदी ; भाविकांत नाराजी हिंदवी न्यूज | आळंदी  संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात देवशयनी आषाढी एकादशी दिनी भाविकांनी श्रीचे दर्शनास हरीनाम गजर करीत रांगा लावून श्रींचे दर्शनास गर्दी केली. परिसरातून आलेल्या भाविकांनी श्रींचे संजीवन समाधीचे दर्शन घेवून नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. परंपरेने श्रींचे पालखीची ग्रामप्रदक्षिणा हरिनाम गजरात, इंद्रायणीला पूरआल्याने पान दरवाजा मार्ग बाधित झाला. भाविकांना गांधी रामवाड्यातील विकसित दर्शन बारीतून मंदिरात प्रवेश देण्यात आला. भाविकांची इंद्रायणी नदीवर गर्दी होऊ नये,  यासाठी पोलीसप्रशासनाने अडथळे, दोरी लावून मज्जाव केला. पोलीस प्रशासनाने भाविकांना नदी घाटावर जाण्यास रोखल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. नदी पूर…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी  आषाढी एकादशी निमित्त वडमुखवाडी येथील माऊलींचे विसाव्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात देवशयनी आषाढी एकादशी दिनी ट्रस्ट तर्फे पांडुरंग रायांची महापूजा हरिनाम गजरात करण्यात आली. या वेळी श्री पांडुरंगराय, रुक्मिणीमाता श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तींना दही, दूध, मध, अत्तर लावून श्रींची पूजा, अभिषेक, पुष्पहार अर्पण करून महापूजा थोरल्या पादुका मंदिराचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, ॲड. मयूर तापकीर, सुनिता तापकीर, कीर्ती तापकीर आणि समस्त तापकीर परिवार यांच्या वतीने महापूजा, आरती करण्यात आली.  हरिनाम गजरात श्रींना फराळाचा महानैवेद्य यावेळी वाढविण्यात आला. या वेळी मंगेश गराडे, राजेंद्र नाणेकर, साहेबराव काशीद, शिवाजी…

Read More

पीसीयूमध्ये पुणे मॅनेजमेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांचा ‘दीक्षारंभ’ संपन्न हिंदवी न्यूज | पिंपरी विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक दृष्टीकोनातून पहावे आणि पाठ्य पुस्तकांशिवाय अवांतर ज्ञान मिळविणे, शिस्त, वृत्तपत्र वाचन, बाजारपेठेची समज आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उच्च शिक्षण घ्यावे. व्यवस्थापन शास्त्र शिक्षणामुळे योग्य आणि अयोग्य यामधील फरक ओळखण्याची आणि विवेकपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता विकसित झाली पाहिजे असे मार्गदर्शन टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीजचे डायरेक्टर शंकर जाधव यांनी केले. कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे यांनी पुणे मॅनेजमेंट स्कूलच्या चौथ्या बॅचचे स्वागत करताना पीसीईटीच्या समृद्ध शैक्षणिक वारशाचा उल्लेख केला. त्यांनी उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, चॉईस बेस्ड शिक्षणपद्धती, नियमित औद्योगिक भेटी, उद्योगतज्ज्ञांशी संवाद, प्रोजेक्ट-आधारित शिक्षण आणि ‘वन फॅकल्टी, वन इंडस्ट्री’ याची माहिती…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी  गेले दोन ते तीन महिन्यांपासून चिंचवडगाव व परिसरात सतत विद्युत पुरवठ्याचा  खेळखंडोबा होत आहे.  वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे चिंचवडगाव, केशवनगर, तानाजी नगर व परिसरातील नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी महावितरण अभियंता मुंडे यांना निवेदन दिले आहे. योग्य नियोजन नसल्यामुळे वारंवार विद्युत  पुरवठा खंडित होतो.  अनेक वेळा खाजगी एजन्सी वेळेत न भेटणे, केबल टेस्टिंग गाडी वेळेत न मिळणे ही महत्त्वाची कारणे पुढे केली जातात. परंतु या दोन गोष्टीचे नियोजन अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे. नियोजनाचा अभाव असल्या मुळे याचा जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  अनेक ठिकाणी…

Read More

राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडून आषाढी एकादशी निमित्त विशेष सन्मान; शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल हिंदवी न्यूज | पिंपरी  शिक्षण क्षेत्रात दूरदृष्टी, सामाजिक बांधिलकी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांना राष्ट्रीय श्रमिक आघाडी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘शिक्षणमहर्षी’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंत भोसले यांनी आज (दि. २४) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना यशवंतभाऊ…

Read More

सलग दुसऱ्या वर्षी कामगार वारकरी मेळावा व सांगता समारंभ; दोन हजारांहून अधिक भाविकांचा सहभाग अपेक्षित हिंदवी न्यूज | पिंपरी  आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शनिवारी (दि. २५ जुलै) भव्य दिंडी, कामगार वारकरी मेळावा व सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रमिक, वारकरी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व धर्मीय भाविकांना वारकरी संप्रदायाची भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंत भोसले यांनी शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. भोसले म्हणाले की, दि. २५ जुलै रोजी सकाळी ११.३०…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्बन महिला सेल, पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने स्वर्गीय नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त चिखली पोलीस ठाण्यात महिला सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व डॉक्टरांचा शाल, श्रीफळ, ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्बन महिला सेलच्यावतीने स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त चिखली पोलीस ठाण्यात अभिवादन करण्यात आले. चिखली पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजितजी जाधव सर, यांचा तसेच महिला सुरक्षेसाठी उल्लेखनीय कार्य करणऱ्या पोलीस अधिकारी दीपमाला लोहकरे यांचा शाल, श्रीफळ, ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. दादांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन…

Read More