Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»मुळशी»पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा
मुळशी

पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे प्रशासनाला सूचना

हिंदवी न्यूज  | पिंपरी 

पिंपरी – पुणे–लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देऊन काम पूर्ण होण्याची निश्चित कालमर्यादा स्पष्ट करावी. तळेगाव, पिंपरी, देहूरोड आणि चिंचवड या प्रमुख स्थानकांवर मेल, एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देणे तसेच अतिरिक्त आरक्षित डब्यांची सुविधा उपलब्ध करावी. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव आणि लोणावळा स्थानकांवरील कामांमध्ये आवश्यक सुधारणा करून ती तत्काळ पूर्ण करण्याची सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे आणि सोलापूर रेल्वे विभागाची आढावा बैठक पार पडली. पुणे, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर विभागातील रेल्वे प्रवाशांच्या सोयी-सुविधा, सुरक्षितता आणि प्रलंबित प्रश्नांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार बजरंग सोनवणे, विशाल पाटील, डॉ. अमोल कोल्हे, भास्कर भगरे, मेधा कुलकर्णी, ज्योती वाघमारे, बालाजी काळगे, धैर्यशील माने, ओमराजे निंबाळकर, निलेश लंके, धैर्यशील मोहिते पाटील, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव, उपमहाव्यवस्थापक कृष्ण किशोर मिश्रा, पुणे रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक प्रभात कुमार, प्रधान मुख्य अभियंता रजनीश माथुर, मुख्य प्रशासकीय अधिकारी भुवनेश कुमार गुप्ता तसेच रेल्वे विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, कामशेत एलजी गेट क्रमांक ४२ येथील सबवेमध्ये पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आरओबी अथवा योग्य पर्यायी मार्ग उपलब्ध करावेत. मळवली एलजी गेट क्रमांक ३२ येथील प्रलंबित आरओबीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करावी. केशवनगर–वडगाव गेट क्रमांक ४९ जवळील अंडरपास सुरू करावा. जांभुळवाडी येथील अंडरपासजवळील रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे व पाणी साचण्याची समस्या दूर करत काम पूर्ण करावे. पुण्याकडून येणाऱ्या महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये गर्दीमुळे पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना चढण्यासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने आवश्यक अतिरिक्त सुविधा व व्यवस्था उपलब्ध कराव्यात.

 

प्रगती, महालक्ष्मी, चेन्नई एक्स्प्रेसला थांबा द्यावा 

फुगेवाडी येथील सुरू असलेल्या पुश पुलाच्या कामामुळे स्मशानभूमी व दफनभूमीकडे जाणारा पूर्वीचा मार्ग आरटीओशी समन्वय साधून लवकरात लवकर पुन्हा सुरू करणे तसेच काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांसाठी पायी जाण्याचा मार्ग सुरू ठेवण्यात यावा. प्रगती एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि चेन्नई एक्स्प्रेसला चिंचवड रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा.

पुणे–लोणावळा मार्गावर प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन दुपारच्या वेळेत अतिरिक्त लोकल सुरू करावी. कोविड काळात बंद करण्यात आलेले रेल्वे गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत. सह्याद्री एक्स्प्रेस पूर्ववत मुंबईपर्यंत सुरू करावी आणि बारामती–कर्जत पॅसेंजर पूर्ववत सुरू करण्याची सूचना खासदार बारणे यांनी केली.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleक्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयात स्वातंत्र्यदिन संपन्न
Next Article सायन्स पार्कमध्ये राष्ट्रीय अंतराळ दिन उत्साहात
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयात स्वातंत्र्यदिन संपन्न

August 22, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

आळंदीतून आजोळघरी माऊलींचे पालखी सोहळ्यास पाहुणचारासह निरोप

July 9, 2026

मदत केंद्रांमध्ये आयुक्तांकडून सोयी-सुविधांची पाहणी

July 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?